कल्याण डोंबिवलीत घरफोडीचे सत्र सुरु

( श्रीराम कांदु )

डोंबिवली  : कल्याण डोंबिवलीत घरफोडीचे सत्र सुरु असून चोरट्यांनी अक्षरश धुमाकूळ घातल्याचे वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे .गेल्या दोन दिवसात कल्याण डोंबिवलीत चार ठिकाणी घरफोड्या झाल्या असून चोरट्यांनी एकूण दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे .या चार प्रकरणी विविध पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली औष्ण पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे .

डोंबिवली पश्चिमेकडील गोपीनाथ चौक देवीचा पाडा देवकी लक्ष्मण सोसायटी मध्ये राहणारे सत्यम महाडिक हे काल सकाळी आपल्या राहत्या घरी झोपले होते मात्र त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत घरातील रोकड व तीन मोबाईल असा मिळून एकूण २८ हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला .सकाळी साडे आठ वाजता उठल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे  लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली .तर दुसरी घटना डोंबिवली पश्चिमेकडील सुभाष रोड ओम भोलेनाथ कृष्ण बिल्डींग मध्ये घडली आहे या इमारती मध्ये राहणारे प्रतिक ठाकरे हे घरात झोपले होते मात्र त्यांच्या घराचा उघडा राहिला होता या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे त्यांच्या घरात प्रवेश करत घरातील लापटोप व दोन मोबाईल असा मिळून एकूण २५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला झोपेतून उठल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे कळले त्यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .तिसरी घटना डोंबिवली पश्चिम परिसरात घडली आहे कोपर क्रोस रोड उर्मी दर्शन सोसायटी मध्ये राहणारी महिला काल सकळी साडे नावू वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेली होती यावेळी अज्ञात चोरट्याने त्याच्या घराचा कुलूप कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड मिळून १ लाख १५ ह्जारंचा मुद्देमाल लंपास केला .सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनि या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .चौथी घटना डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शील रोड लगत घडली आहे .कल्याण शिळ रोड ललित काट्याजवळ चंद्रलोक आर्केड मध्ये रान्हारे कम्लेश पाटील काल सकाळी घराचा दरवाजा ओढून घेतकागी वेळेकरीता बाहेर गेले होते .हि संधीसाधत अज्ञात चोरट्याने अर्धवट उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करत घरातील लपटोप व मोबाईल असा मिळून एकूण ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला काही कालावधीत घरी परतल्या नंतर त्याना घरात चोरी झाल्यचे ल लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसानि अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email