कल्याण ; गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या रागातून तरुणासह त्याच्या मित्राला चाकू व लोखंडी रोड ने हल्ला
कल्याण दि.२३ – गुन्ह्यात साक्षीदार असल्याचा राग मनात धरून साक्षीदार तरुणासह त्याच्या मित्राला लोखंडी रोड ने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. या प्रकरणी कोल्शेवादी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलीसनी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. कल्याण पूर्व कोलशेवाडी कैलास नगर पावशे रोड शिवसाई हाईटस अपार्टमेट मध्ये राहणारे अजय दंडवते हा रविवारी सायंकाळी आपला मित्र लक्ष्मण शाही याला कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली येथे घरी सोडण्यासाठी दुचाकीने जात होता.
हेही वाचा :- दोन लाखांचे बांधकाम साहित्य लंपास
त्यावेळी त्यांना राजू चौरसिया, आकाश मोहिते, राजू कदम सुरज चौहान, अहमद खान यांनी त्यांना अडवले. व खाली पडून शिवीगाळ करत ठोशा बुक्क्यांनी मारहन करण्यास सुरुवात केली लक्ष्मण या आरोपीविरोधात साक्षीदार असल्याचा राग मनात धरून राजू याने लक्ष्मण वर चाकूने हल्ला करण्यास धावला तर राज कदम याने लोखंडी रोड ने अजय यांच्या डोक्यावर हल्ला केला .या प्रकरणी अजय याने कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी राजू चौरसिया, आकाश मोहिते, राजू कदम, सुरज चौहान, अहमद खान विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.