कल्याण उपजिल्हाप्रमुखपदी भरत भोईर यांची निवड झाल्याबद्दल शिवसैनिकांनी केला सत्कार

(श्रीराम कांदु)

   डोंबिवली –शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल शिवसैनिकांच्या वतीने  भरत भोईर यांचा डोंबिवली पूर्वेकडील शिवप्रतिमा सभागृह येथे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे , स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे , तालुका प्रमुख एकनाथ पाटील , महिला संघटक कविता गावंड, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश पाटील , पंचायत समिती सदस्य कैलाश ठोंबरे , पिंपरी ग्रामपंचायत सरपंच सपना मेंदारकर, युवा सेना पदाधिकारी योगेश म्हात्रे , उपतालुका प्रमुख बंडू पाटील , विलास भोईर आणि भगवान पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

      कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे , तालुकाप्रमुख एकनाथ पाटील आणि स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या हस्ते कल्याण उपजिल्हाप्रमुख भरत भोईर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले , सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री तथा ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांना शाखाप्रमुख ते नेतेपद मिळाले. मात्र त्यांनी सत्कारापेक्षा जनतेचे काम करणे महत्वाचे आहे असे शिंदे म्हणाले होते. मात्र आता शिवसेना नेतेपद मिळाल्यावर मात्र शिवसैनिकांनी त्यांचा जाहीर सत्कार करायचे ठरवले. शिंदेंनीसुद्धा शिवसैनिकांनी भावना ओळखून होकार दिला. तसेच शिवसेनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचाही सत्कार होतो. कल्याण उपजिल्हाप्रमुख भरत भोईर यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे. शिवसेनेने यापूर्वी जेवढे कार्यक्रम केले त्यात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी खूपच चांगल काम केले.मात्र शिवसैनिकांनी आपसात राजकारण न करता एकत्र काम केले पाहिजे. जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या भाषणात शिवसैनिकांना चांगले मार्गदर्शन केले. तालुकाप्रमख एकनाथ पाटील म्हणाले , ग्रामीण भागात आजही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. भोपर गावात दररोज दररोज १५ टॅकर पाणी पुरवठा होत आहे. नांदिवली , संदप आणि घारीवली गावातहि पाणी समस्या आहे. यावेळी सुखदेव पाटील ,  धर्मराज शिंदे , नेताजी पाटील , संतोष काळण, सुखदेव पाटील , चंद्रहास पाव्हेरकर,अशोक पटेल, अजय , मालणकर , प्रशांत शिंदे , जयंता पाटील , सतीश पाटील , गणेश जैपाल, अनंता जाधव , प्रभाकर पाटील , भावेश भोईर , चंद्रकांत उपाध्ये या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email