कल्याणात मराठ्यांनी सरकारचे श्राद्ध घातले

कल्याण दि.२५ – कल्याणात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने कल्याणात शिवाजी चौक ते तहसील कार्यालय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शामिल झालेल्या हजारो मराठा बांधवांनी तहसील कार्यलयाबाहेर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणा बाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरक्षण न देणाऱ्या राज्य सरकारचे श्राद्ध घातले. यानंतर मुंडन करून निषेध व्यक्त केला दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलन कर्त्यांनी संध्याकाळी ५ वाजता कल्याण तहसीलदारांना निवेदन दिले.

मराठा आरक्षणाबाबत मराठा संघटना आक्रमक झाल्या असून राज्यभरात आंदोलने छेडलें आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सकाळपासूनव्ह आजूबाजूच्या परिसरातून हजारो कार्यकर्ते कल्याणच्या शिवाजी चौकात धडकले. दरम्यान मराठा आंदोलना दरम्यान गेलेल्या पहिला बळी काकासाहेब शिंदे या तरुणाला सुरुवातीलाच श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवाजी चौकातून तहसील कार्यलयापर्यंत मोर्चा काढल्या नंतर तहसील कार्यलयाबाहेर ठिय्या देत जोरदार घोषणा बाजी केली.

हेही वाचा :- ठाण्यात आंदोलकांनी रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले

मोर्चात तरुण तरुणी वर्गासह महिला वृद्ध तसेच लहान मुलाचा सहभाग दिसून येत होता. तहसील कार्यालया बाहेर झालेल्या भाषणबाजीनंतर आंदोलकांनी आरक्षण न देणाऱ्या सरकारमधील आमदार आणि खासदारांचे श्राद्ध घालत मुंडन करून निषेध व्यक्त केला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर कल्याणात स्टेशन परिसरातील दुकाने , रिक्षा, बस, बंद ठेवण्यात आली होती.

हेही वाचा :-  पत्नीला फिनेल पाजत जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न – डोंबिवलीतील घटना

सकाळी काही ठिकाणी रिक्षा वाहतूक सुरू होती मात्र शिवाजी चौकात आंदोलन कर्ते जमू लागताच खबरदारीचा उपाय म्हणून सर्व वाहतूक बंद करण्यात आली तर दुचाकी स्वरासाठी मार्ग बदलण्यात आला होता. बंदच्या पार्श्वभूमीवर कल्याणातील काही शाळांनी सुट्टी जाहीर केली होती तर काही शाळा लवकर सोडण्यात आल्या. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही हिंसक घटना घडू नये यासाठी चौकाचौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही अतिउत्साही आंदोलकांनी कल्याण रेल्वे स्थानकानजिक केडीएमटीची बस फोडली. दोन रिक्षाची नासधूस केली. मात्र पोलिसांनी वेळीच आंदोलकांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email