कल्याणात दिवसा घरफोडी

कल्याण दि.०३ – कल्याण पश्चिम साई चौकात मंगला गार्डन मध्ये राहणारे उदय चव्हाण यांची कल्याण शिळ रोड येथील म्हात्रे पाडा येथे रीशिराज इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनी आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास उदय कंपनी बंद करून घरी निघून गेले. शटर ला टाळा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या शटर चे लॉक तोडून कंपनीत प्रवेश करत सुमारे ६ लाख ९९ हजार किमतीचे कास्टिंग मटेरियल चोरून नेले. काल सकाळी कंपनीत आल्या नंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

तर दुसरी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. कल्याण पूर्व काटेमानवली परीसरातील वेदिका सोसायटी मध्ये राहणारे विजेन्द्र सिंह हे सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मिळून सुमारे १ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. घरी परतल्या नंतर त्यांना चोरी झालाचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.