कल्याणात चरस गांजा तस्कर गजाआड
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१० – कल्याण मध्ये गांजा आणि चरसच्या विक्री चा गोरख धंदा करणार्या अट्टल तस्करला तीन किलो चरस आणि चार किलो गांज्या सह बाजारपेठ पोलिसानी अटक केली आहे.
हुसैन खान उर्फ कमांडो असे या तस्करचे नाव असून या आधी हिं त्याच्या विरोधात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काश्मीर हुन मुंब्रा येथे बेकायदेशीरपणे गांजा चरस सारखे अमली पदार्थ आणून त्यांची विक्री सुरु असून या धंद्याची पाळे मुळे कल्याण पर्यंत पोहचल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली होती .मुंब्रा येथून कल्याण मध्ये गांजा व चरस येत असल्याने या तस्करला जेरबंद करण्यासाठी पोलीस यंत्रणेने जंग जंग पछाडले होते.बाजारपेठ पोलिसाना याची भनक लागली पोलिसानी तात्काळ कल्याण आंबेडकर रोड येथे सापळा रचत या परिसरातून हुसैन खान उर्फ कमांडो या तस्करला अटक केली. त्याच्याकडून तीन किलो चरस आणि चार किलो गांज्या जप्त करन्यात आला आहे आरोपी हुसैनवर याआधी अशा प्रकारचे 7 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनि दिली.