कल्याणात एकाच दिवशी तीन विविध ठिकाणी तीन हत्या
श्रीराम कांदु
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण परिमंडळ ३ मधील महात्मा फुले ,खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस ठाणे ,तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हत्या झाली आहे . या हत्ये मध्ये एक वृद्धाची हत्या केवळ एक रुपया जास्त घेल्याच्या क्षुल्लक कारणावरून झाली तर उर्वरित दोन्ही हत्या पूर्व वैमन्यस्यातून झाली असल्याचे उघड झाले असून या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्ती मुळे पोलीस यंत्रणा चांगलीच खडबडून जागी झाली आहे .
कल्याण मधील महात्मा फुले ,खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्थानकांच्य हद्दीत तिघा जणांची हत्या झाल्याने शहरात एकच खलबळ उडाली आहे .कल्याण पुर्वेकडील आनंदवाडी परिसरात क्रिकेट मॅचच्या जुन्या वादातून गुरुवारी अशोक मालुसरे या तरुणाला याच परिसरात राहनार्य तस्लिम शेख व लल्लन या दोघा जणांनी बेदम मारहाण केली होती यात अशोकला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला .या प्रकरणी दोघा विरोधात कोळशेवाडी पोलिसानी गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे .मयत अशोक मालुसरे हा हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याने त्यांच्या हत्ये मुळे हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुक्मिणी बाई रुग्णालयात एकच गर्दी केली होती .दुसरी घटना कल्याण नजीक आंबिवली परिसरात घडली .कल्याण नजीक असलेल्या आंबिवली भागात एक मेकांच्या शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांचे गेल्या अनेक वर्षा पासून असलेल्या पूर्व वैमान्य. तुन सोनू सिंग या २८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. या प्रकरणी अस्वल सिंग याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे .तिसरी हत्या तर एक रुपयाच्या वादातून झाली आहे .कल्याण पश्चिम कडील रामबाग परिसरात राहणारे मनोहर गामने (५६ ) या वृद्ध इसमनाने प्रभू ब्रदर्स दुकानातून दोन अंडी खरेदि केली असता दुकानदराने दोन अंडयांचे अकरा रुपये झाले सांगितलं मनोहर गामने यांनी दोन अंडी सर्वत्र दहा रुपयाला मिळतात मग एक रुपया तुम्ही जास्त का घेता असे दुकानदाराला सांगितले असता दोघा मध्ये वाढीव एका रुपयावरून वाद झाला वादाचे पर्यावसन शिगेला पोहचले व रागाच्या भरात दुकानदाराने वृद्ध इसमाला संतापाच्या मारहाण करीत जमिनीवर पडल्याने मर्मी घाव बसल्याने मनोहर जखमी झाले उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलिसानी सदर दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे .दरम्यान एका दिवसात शहरात तीन हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Please follow and like us: