कल्याणमध्ये ‘विठूरायाच्या गजरातून चिमुरड्या वारकऱ्यांचा ‘पर्यावरण रक्षणा’चा संदेश

कल्याण – आषाढी एकादशीचे औचित्य साधत कल्याणच्या बालक मंदिर प्राथमिक शाळेने काढलेल्या दिंडीमध्ये चिमुरड्या वारकऱ्यांनी ‘विठुरायाच्या गजरातून पर्यावरण रक्षणचाही जागर केल्याचे दिसून आले. नमस्कार मंडळापासून काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये तब्बल ५५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

आपल्या समृद्ध अशा रूढी आणि सांस्कृतिक परंपरांची नव्या पिढीला माहिती होण्यासाठी बालक मंदिर शाळेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. आज काढण्यात आलेली विद्यार्थ्यांची दिंडीही हा त्याचाच एक भाग. विठ्ठल रुख्मिणीसह अनेक संतांची वेशभूषा केलेल्या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गजरात कल्याण शहर दणाणून सोडले. तर विठुरायाच्या जोडीला शेकडो विद्यार्थ्यांनी या दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचाही जागर केल्याचे दिसून आले.प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळा, झाडे लावा-झाडे जगवा, आदी आशयाचे फलक आणि जोरदार घोषणाबाजी करीत विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची हाक दिली.

नमस्कार मंडळापासून सुरू झालेली ही दिंडी टिळक चौक, देवी अहिल्याबाई चौक, शंकरराव चौक मार्गे शिवाजी महाराज चौकातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आली.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पहोते.
वार,पंडितवाडी संस्थेचे अध्यक्ष विनायक मालसे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email