कल्याणमध्ये दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवून सोनाराला लुटले.
(म विजय )
डोंबिवली येथील घटना ताजी असतानाच आज कल्याणमध्ये सोनाराला लुटण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
कल्याण पश्चिमेतील सोने-चांदीच्या पेढीत घुसून दोघांनी बंदुकीच्या धाकाने ३ तोळे सोने आणि अडीच लाखांची रोकड लुटून नेली. या प्रकारामुळे कल्याण डोंबिवलीतील सोने चांदीच्या व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
आज दुपारच्या सुमारास जयमल्हार नगर येथील आर. के. ज्वेलर्समध्ये अचानक दुचाकीवरून आलेले दोन जण घुसले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत अडीच लाख रुपये रोख रक्कम आणि तीन तोळे सोनं लुटून नेले
यावेळी गोळीबार करण्याचाही या दोन लुटारूंचा प्रयत्न होता, मात्र घाईघाईत त्यांच्या पिस्तुलाचं मॅगझीन खाली पडलं आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला. लोकांनी त्यांना पकड्ण्याचाही प्रयत्न केला, मात्र पुन्हा बंदुकीचा धाक दाखवत हे दोघे पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.