कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटलतर्फे वाहतूक पोलिसांना रेनकोट वाटप

कल्याण दि.१४ – पावसाचा जोरदार तडाखा शहराला बसत असताना वाहतूक नियंत्रण करणे हे मोठे काम असते. कल्याणच्या वाहतूक पोलीसांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना कौतुकाचा भाग म्हणून कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या वतीने वाहतूक विभागाला रेनकोटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम कल्याणच्या वाहतूक पोलीस विभागातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. अनिल वसंतराव देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला.

वाहतूक पोलिसांच्या चिकाटीला सलाम करताना रस्ते सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडणाऱ्या पोलिसांना मदतीचा हात पुढे करणे, रेनकोटच्या माध्यमातून प्रचंड पावसाच्या तडाख्यापासून त्यांना सुरक्षा कवच देणे हा या रेनकोट वाटप कार्यक्रमाचा उद्देश होता.

या उपक्रमाविषयी बोलताना कल्याणच्या वाहतूक पोलीस विभागातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. अनिल वसंतराव देशमुख म्हणाले, “कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलची ही कृती कौतुकास्पद आहे. पाऊस कोसळत असतानाही आता आमच्या वाहतूक पोलीस दलाला सर्व साधनांनी सुसज्ज अशी अधिक चांगल्या प्रकारे सेवा बजावता येईल.”

या उपक्रमाबद्दल बोलताना कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या सुविधा संचालक डॉ. सुप्रिया अमेय म्हणाल्या, “विशेषकरून पावसाळ्यात रस्ते वाहतूक सुरक्षित राहावी म्हणून वाहतूक पोलीस जे अखंड कष्ट घेत काम करत असतात त्याचे आम्हांला खूपच कौतुक आहे. शहराच्या या रक्षणकर्त्यांच्या कर्तुत्वाला आणि प्रयत्नांना सलाम करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला.”

याआधी, ३५० हून अधिक रेनकोटचे वाटप कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संबंधित पोलीस स्थानकातील पोलीस दलाला करण्यात आले होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email