कल्याणडोंबिवली गुन्हे वृत्त
डोंबिवलीत घरफोडी
देवघरातील चांदीच्या मूर्त्यांसह रोकड लंपास
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील एम आय डी सी सुदामा नगर अखिल सुदामा सोसायटी मध्ये राहणारे अनिल चव्हाण काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते .ही संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांकय्या घराची कुलूप कोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील चांदीच्या देवांच्या मुर्त्या ,कॅमेरे ,रोकड ,चांदीची भांडी असा मिळून हजाराचा मुद्देमाल लंपास केला सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे .
—————————— —————————— ————————-
फायनान्स कंपनीचे हप्त्याचे पैसे लांबवले
डोंबिवली :पिसवली येथे राहनरा स्वप्नील गायकवाड हा अंधेरी येथील फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत असून त्याने फायनान्स कंपनीच्या कर्जदारांकडून जमा केलेले एकूण हप्ते 45 हजार रुपये याच परिसरात राहणाऱ्या उमेश उपाध्याय याला कल्याण रेल्वे स्थानक येथे भेटून भरण्यासाठी दिले होते .मात्र दोन दिवस उलटूनही उमेश ने हे पैसे न न भरता अपहार केल्याच्या लक्षात आल्याने स्वप्नील ने या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी उमेष विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
—————————— —————————— —————————— —-
रेल्वे चे तिकीट काढून देण्याचे आमिष दाखवून डेबिट कार्ड घेत बँक खात्यातून २४ हजार लंपास
डोंबिवली :रेल्वे चे तिकीट काढून देतो डेबिट कार्ड लागेल असे आमिष दाखवत डेबिट कार्ड घेत त्या सहाय्याने त्यांच्या खात्यातून तब्बल २४ हजारांची मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी महात्मा फुले पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
- भिवंडी कोणगाव येथे राहणारे रामबाबूं वर्मा काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसह उत्तर प्रदेश येथे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात आले होते .मात्र तिकीट न मिळाल्याने ते पुनः घराकडे जाण्यासाठी निघाले.मध्येच एक इस्माने त्यांना हटकले आपण तिकीट दलाल असल्याचे सांगत तिकीट काढून देतो असे सांगत वर्मा जवळील स्लिप घेऊन पुन्हा तिकीट काउंटर जवळ गेला व काही वेगाने पुन्हा येऊन डेबिट कार्ड असेल तर दोन तिकीट कँर्फम मिळेल आणि दोन तिकीट वेटिंग मिळेल असे सांगितले .या आमिशाला।बळी पडून वर्मा यांनी आपल्याजवळील डेबिट कार्ड त्यांला दिले त्यानंतर त्या इसमाने डेबिट कार्ड वर पिन नंबर लिहण्यास सांगितले त्यानंतर दुसऱ्या एका इसमाचे डेबिट कार्ड देत वर्मा यांचे कार्ड घेऊन पसार झाला तसेच त्यांच्या बँक खात्यातून 24 हजार रुपये लंपास केले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अद्न्यत इसमा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे
Please follow and like us: