कल्याणजवळील सूचक  नाक्यावर  ट्रकवरील लोखंडी रोल निसटून  आदळला  गाडीवर, तीन जखमी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली,दि. २२ – कल्याण येथील सूचक नाक्यावर  एका ट्रक मधून लोखंडी रोड निसटून पाठीमागील एका गाडीवर आदळल्याने या गाडीमधील  तीन  प्रवासी जखमी झाले. या अपघातात यामध्ये तर या  गाडीचा चक्काचूर झाला. 

     भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता प्रामुख्याने कल्याणमधून जातो. तसेच हा रस्ता पुढे नवी मुंबई, पुणे, पनवेल, तळोजा, मुंबई-नाशिक महामार्गला जोडणारा असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. सध्या मुंब्रा बायपासची अवजड वाहनांची वाहतूक कल्याण-शीळ रस्त्याने वळवल्याने शहरातील कल्याण पत्रीपूल, नेतविली, सूचकनाका, टाटा नाका, लोढा जंक्शन, शिवाजी चौक, सहजानंद चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. विशेषत: कंटनेर, ट्रेलरची वाहतूक भर शहरातून सुरू आहे.वेळेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करत सुरू असलेली अवजड वाहतूक शहरात वाहतूक कोंडी निर्माण करत असतानाच आता  वाढणा-या अपघातामुळे नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे . २  जून रोजी सायंकाळच्या सुमारास आई वडिलांसोबत दुचाकीवर जाणाऱ्या ८  वर्षाच्या आरोह आत्राळे याचा टँकर खाली सापडल्याने अपघाती मृत्यू झाला होता .त्यापाठोपा शहरातील अत्यंत वर्दळ असलेल्या शिवाजी चौकात 5 जून रोजी सकाळी च्या साडे सहा वाजण्याच्या  सुमारास  शिळफाट्याच्या दिशेला जाणारा  कंटेनर  वळण घेत असताना त्यावरील भलामोठा  लोखंडी पाईप निसटून खाली पडला आणि हा कंटेनर उलटला. घटना सकाळी झाडे सहाच्या सुमारास घडल्याने जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतरही वाहतूक पोलिसांचे डोळे उघडले नसून वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत .त्यातच आज सकाळी कल्याण पूर्वेतील सुचकनाका परिसरात शुक्रवारी  पुन्हा एकदा अपघात झाला. लोखंडाचे अवजड रोल वाहून नेणाऱ्या कंटेनरवरील एक रोल अचानक सुटला आणि शेजारी असणाऱ्या फोर व्हीलरवर आदळला. गाडीच्या दरवाजावर पडल्याने गाडीत असणाऱ्या व्यक्तींच्या जीवावर बेतले आहे .  या अपघातात  उषा कांबळे ,कनक तारा  आणि गाडीचालकाला  दुखापत झाली आहे. या महिला नवी  मुंबई येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. सकाळी कंपनीच्या कारमध्ये बसून हे कामावर जात होते. त्यामुळे वाहतुकीची वेळ व नियम फाट्यावर मारत सुरू असलेली अवजड वाहनाची वाहतूक वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असतांनाच आता यातून होणाऱ्या अपघातामुळे नागरिकाच्या जीवावर बेतू लागली असली तरी वाहतूक पोलीस यंत्रणा नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनांना चिरीमिरी घेत जणू मार्ग मोकळा करत आहेत .अवजड वाहनांमूळे सतत वाढत असणाऱ्या या अपघाताच्या घटनांवर लवकरात लवकर आळा घातला नाही तर येत्या काळात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

वाहतूक पोलीसांची बघ्याची भूमिका

   मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीमुळे रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत अवजड वाहनांना कल्याण शहरातून मार्गक्रमण करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी सायंकाळनंतर शहरात अवजड वाहनांची वाहतूक बिनदिक्कत सुरु असून आहे.

हेही वाचा :- उद्यापासून प्लास्टिक बंदी, प्लास्टिक वापरणाऱ्यांना ५ हजारांचा दंड  

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email