कल्याणच्या स्कायवॉकवरील तुटलेल्या रेलिंग मूळे खाली पडून अंधव्यक्ती जखमी
स्कायवॉक देखभाल दुरुस्तीकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष
कल्याण :- स्मार्ट सिटीची उत्तुंग स्वप्ने दाखविणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेत नागरिकांना मूलभूत सुविधा मिळविताना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्टेशन परिसरातुन बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सुरक्षित बाहेर येता यावे यासाठी पालिका प्रशासनाने काही कोटी रुपये खर्चून उभारलेल्या स्कायवॉकच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्यास देखील प्रशासनाला वेळ नसल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. आज दुपारी उपचारासाठी या स्कायवाकवरून रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे जात असलेली बाबू तलर ही अंध व्यक्ती स्कायवाकच्या तुटलेल्या रेलिंग मूळे उंचावरून खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कल्याण स्टेशन परिसरात महापालिका प्रशासनाने एमएमआरडीएच्या माध्यमातुन खर्चून स्काय वाक उभारले असून या स्कायवाकवर असलेला गर्दुल्याचा आणि फेरीवाल्याचा वावर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेला असताना पालिका प्रशासनाला या स्काय वाक च्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. या स्काय वाक चे रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे उतरनाऱ्या जिन्याजवळील रेलिंग तुटलेले असून याची दुरुस्ती करण्यास पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज एक अंध व्यक्तीला हकनाक जखमी व्हावे लागले. बाबू तलर नावाची अंध व्यक्ती या स्काय वॉक च्या रेलिंगचा आधार घेत रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे जात होता. मात्र तुटलेल्या रेलिंगचा अंदाज न आल्याने स्काय वाकच्या पायऱ्या समजून उतरायचा प्रयत्न करणाऱ्या तलर यांचा तोल गेल्याने ते थेट उंच स्काय वॉक वरून रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकीवर पडले. त्याना त्वरित रुक्मिणीबाई रुग्णालयत नेले धक्कादायक बाब म्हणजे रुक्मिणी बाई हॉस्पिटल मध्ये जेव्हा बाबू यांना उपचारासाठी नेण्यात आले. तेव्हा व्हीलचेयर चालवणाऱ्या कर्मचारी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध न्हवता ते हि काम बाबू याच्या बहिणीला करावा लागला. या दुर्घटनेत बाबू जबर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला असून यांना गंभीर दुखापत झाली आहे.
जखमी झालेला अंध व्यक्ती हा कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात राहणारा असून, त्याला उपचारासाठी ठाणे येथील कळवा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मात्र या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून नागरिकांच्या त्रासाची प्रशासनाला परवा नसल्याचे स्पष्ट होत आहे. आतातरी महापालिका प्रशासन लक्ष घालणार हे पाहावे लागले.