कल्याणच्या सिटीझन्स फोरमने जागविल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती

(तेजस राजे)

कल्याणच्या सीटीझन्स फोरमतर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणी अनोख्या पध्दतीने जागविण्यात आल्या. सीटीझन्स फोरमने कल्याण रेल्वेस्थानकालगत असलेल्या नेहरु चौकात इंदिरा गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मृतिफलक व प्रतिमा उभारण्यात आली होती. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महापौरांपाठोपाठ इतर उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस फुले अर्पण केली.

यासमयी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीं जागवितांना कठीण परिस्थितीत देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या पंतप्रधान असा गौरव केला. त्यानंतर जन्मशताब्दीनिमित्त एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅली नेहरू चौकातून महम्मद अली चौक, शिवाजी चौक, सहजानंद चौक मार्गे काळा तलाव येथे रॅलीचे रुपांतर एका सभेमध्ये करण्यात आले. या सभेला विचारवंत आणि लेखक अणुऊर्जाचे अभ्यासक राजा पटवर्धन यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्याची महती सांगितली.

इंदिरा गांधी यांनी केलेले बँकांचे राष्ट्रीयकरण ते न्यायालयीन लढाईचे वर्णन करुन इंदिरा गांधी यांच्या काराकिर्दींचे ओघवते वर्णन केले. त्यानंतर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला.

या जन्मशताब्दी रॅलीसाठी डॉ. आर. बी. सिंग, विजय पंडित, राजू गवळी, किशोर खराटे, अनिल पंडित, शंकर आव्हाड, साद काझी, अमर काझी, अनिल कर्पे, उमेश बोरगांवकर, मारुती हिंदूराव मास्तर, प्रशांत तोष्णीवाल, अब्दुल गफार शेख, योगेश घुगे, अॅड. विद्या गोळे, कांचन कुलकर्णी, शमीम बानो, धनजीभाई सोमाणी, दामू काबरा इत्यांदीसह शहरातील अनेक मंडळी उपस्थित होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email