कर वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतला आढावा
(श्रीराम कांदु)
कल्याण– कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा मालमत्ता कर हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असून मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रभागक्षेत्र अधिकारी यांचेकडील कामकाजाचा आयुक्त पी. वेलरासू यांनी आढावा घेतला.
प्रभाग निहाय थकबाकी रक्कमेच्या सर्वकष आढाव्याअंती अश्या थकबाकी मालमत्ताधारकांवर कठोर करावाई जसे नळ जोडणी खंडीत करणे, मालमत्तेची अटकावणी व जप्ती करणे व जप्ती केलेल्या मालमत्तांचे जाहिर लिलावाद्वारे विक्री करणेबाबत सर्व संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी यांना सक्त सुचना देण्यांत आल्या आहेत. तसेच याबाबतचे सर्व अधिकार प्रभागक्षेत्र अधिकारी यांना प्रदान करण्यांत आलेले असल्याने त्यांचा संपूर्णपणे वापर करुन नियमानुसार सर्व कार्यवाही पुढील महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशित केले. तसेच सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता कोणतीही व्याजमाफीची ” अभय योजना ” लागू केली जाणार नसल्याचे आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले.
करदात्या नागरीकांनी तसेच थकबाकीदारांनी मालमत्ता कराच्या रकमा तातडीने महापालिका फंडात जमा करुन कटू कारवाई टाळावी.असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.