कर्नाटक विधानसभा निवडणुक जाहिर ; 12 मे रोजी मतदान

 12 मे रोजी मतदान, 15 तारखेला मतमोजणी

काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार 12 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. संपूर्ण निवडणूक एकाच टप्प्यात पार पडेल. त्यानंतर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. या निवडणुकीत 4 कोटी 96 लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत  ईव्हीएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅट मशिन्सचाही वापर होणार आहे.

कर्नाटक हे काँग्रेसची सत्ता असलेल्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे काँग्रेसच्यादृष्टीने ही अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. तर आपल्या काँग्रेसमुक्त भारत या ध्येयाच्या आणखी जवळ जाण्यासाठी या निवडणुकीत भाजपाकडून संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. याशिवाय, या निवडणुकीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मुव्हमेंटम सेट होण्याची शक्यता आहे. अशा अनेक अर्थांनी कर्नाटक विधानसभेची निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपुष्टात येत आहे. 225 सदस्यांच्या विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. दरम्यान, निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष ताकद पणाला लावून रिंगणात उतरले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं आपला गड राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे, बी.एस. येडियुरप्पांना यांना मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा बनवून भाजपानं प्रचाराच्या मैदानात उडी घेतली आहे. तर जेडीएस व बसपा आघाडी करुन निवडणूक लढवणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email