कर्जमाफीचे पितळ उघडे पाडू शिवसेना ; जिल्हाप्रमुख सचिन मुळूक
(म.विजय)
बीड – प्राथमिक सदस्य नोंदणी, शिवसेना स्थापने पासून आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या भेटी, गाव व वार्डातील समस्या जाणून घेण्यासाठी तसेच कर्जमाफीचा फायदा किती शेतकर्यांना झाला? किंवा नाही हे पाहण्यासाठी व मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार कर्जमाफी झाली का हे पाहण्यासाठी बीड जिल्हा शिवसेनेच्यावतीने गाव,वाडी, वस्ती, तसेच शहरातील प्रत्येक वार्डात शिवसेनेची ‘निर्धार शिवशाहीचा’ ही मोहीम पदाधिकारी व शिवसैनिक पोहचवणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘निर्धार शिवशाहीचा’ या मोहिमेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अंतर्गत गावा-गावात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार असून यावेळी शेतकर्यांशी संवाद साधून त्यांच्याशी कर्जमाफी विषयी चर्चा करणार आहेत. तसेच कर्जमाफी खरच मिळाली आहे का? तसेच शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव योग्य मिळत आहे का? वाढती महागाई, बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली का नाही? तसेच शेतकर्यांना येणार्या अनेक अडीअडचणी जाणून घेण्यात येणार आहेत. असे अनेक प्रश्न शिवसेना जाणून घेणार आहे असेही शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी
म्हटले आहे. या मोहिमेमुळे शेतकर्यात व सर्वसामान्य नागरीकात नवचैतन्य निर्माण झाले आहे.