कमबाईड डिफेंस सर्विस एग्जामिनेशन मधे पुणे येथील श्रुति विनोद श्रीखंडे प्रथम
श्रीराम कांदु
यूनियन पब्लिक सर्विस कमीशन द्वारा आयोजित कमबाईड डिफेंस सर्विस एग्जामिनेशन मधे महाराष्ट्रतील पुणे येथील विद्यार्थिनी श्रुति विनोद श्रीखंडे हिने प्रथम स्थान पटकावत महाराष्ट्राचा सन्मान वाढवला आहे.
ब्रिग्रेडिअर विनोद श्रीखंडे यांची कन्या श्रुति हिचा फाइनल रिजल्ट आज त्यांना यूपीएससीच्या वेबसाईटवर समजला ज्यात त्यांना चेन्नईच्या ऑफिसर ट्रेनिंग अॅकाडमी(ओटीए) मधे जाण्याची माहिती दिली होती. श्रुति कायदा या विषयाची विद्यार्थिनी असून यापूर्वी आर्मी पब्लिक स्कूल मधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे.देशभरातुन निवडल्या गेलेल्या २३२ परिक्षार्थ्याँमधून निप्रून दत्ता विद्यार्थ्यांतुन तर श्रुति विद्यार्थिनींमधून प्रथम आली आहे.
Please follow and like us: