कंपाउंडवोल बांधण्याच्या वादातून मारहाण

कल्याण दि.३० – कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हिल परिसरात राहणारे निलेश सूर्यवंशी यांची आधारवाडी जेल रोड येथील लुला कॉम्प्लेक्स येथे जागा आहे .त्यांनी काल आधारवाडी जेल रोड येथील लुला कॉम्प्लेक्स येथे वाल कंपाउंड बांधण्यासाठी काही माणस पाठवली होती मात्र सोसायटीच्या सदस्यांनी त्यांना विरोध करत काम थांबवले .त्यामुले सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सूर्यवंशी आपला ड्रायव्हर व किरण सुरवडे व एका कर्मचार्यासह त्या ठिकाणी या सद्स्यांची समजूत काढण्यासाठी गेले.

मात्र संतापलेल्या सोसायटीच सदस्य विश्वनाथ शेट्टी व त्यांच्या सोबत असलेल्या पाच ते सहा सदस्यांनी हि सोसायटीची जागा आहे इथे काम करायचे नाही असे सांगत सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या कर्मचार्यांना धमकी देत लोखंडी सळीने सूर्यवंशी यांच्या डोक्यावर हल्ला केला यावेळी सूर्यवंशी यांच्या मदती करिता गेलेल्या यांच्या ड्रायव्हरसह कर्मचार्याना हि मारहाण करण्यात आली .या प्रकरणी सूर्यवंशी यांनी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलि असून या तक्रारी नुसार पोलिसांनी विश्वनाथ शेट्टी याच्यासह अज्ञात पाच ते सहा जना विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email