औद्योगिक विभागात पाणी समस्येमुळे उत्पादनावर मोठा परिणाम

(श्रीराम कांदु)
डोंबिवली-गेले काही दिवस औद्योगिक विभागात पाणी अतिशय कमी दाबाने आणि बरेच वेळा येतच नाही. यामुळे उत्पादनावर प्रचंड प्रमाणात घसरण झाली आहे. कामगार बसून त्यांना पगार द्यावा लागतो आहे.पिण्यासाठीसुध्दा बाटल्यांमधून आणि प्रसंगी घरून पाणी न्यावे लागत आहे.
या संदर्भात माहिती देताना ‘कामा ‘संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी म्हणाले औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्यांच्या बैठका घेतल्या तरीही त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही आणि उडवाउडवीची उत्तरे  दिली जातात .आज फेब्रुवारी महिन्यात ही अवस्था आहे तर मे महिन्यात काय होईल याची उद्योजकांना भीती वाटत आहे.असेही ते म्हणाले  बारवी धरणात विपूल पाणी साठा आहे अशी माहीत त्यांचेकडूनच मिळत आहे. पण उद्योजकांना पाणी मिळणे आताच अडचणीचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले
गेली अनेक वर्षे औद्योगिक वसाहतीतील रस्ते अतिशय खराब आहेत. अधिकार्यांच्या नजरेस ही बाब  आणून दिलेली आहे अनेक चर्चा,बैठका,निवेदनं देवून देखील काहीही केले जात नाही.असा आरोप करून ते म्हणाले त्यातच भर म्हणून महानगर गॅसकडून पाईपलाईन टाकली आहे आणि खोदलेले रस्ते तसेच ठेवले आहेत.प्रचंड धूळ परिसरात पसरत असते. कामगारांचे आजाराचं प्रमाण वाढलं आहे. सीपीसीबी प्रदूषण केंद्राकडून धूळ मापक यंत्र जागोजगी लावले आहेत. कारखान्यांच्या् धुळीपेक्षा कैक पटीने रस्त्यावरील धूळ जास्त आहे पर्यायाने एस पी एम लेव्हल 2.5 वाढते .तसेच महानगरपालिका औद्योगिक परिसरातील कचरा उचलत नाही अनधिकृत रहिवासी आपला कचरा औद्योगिक परिसराजवळ टाकून जाळतात व या सर्वाचे  खापर कारखान्यांवर फोडले जाते.कारखान्यांना नोटीसा मिळतात.   अशी खंत त्यांनी व्यक्त केली  ओद्योगिक  विकास महामंडळ आणि कल्याण महानगरपालिका  आपआपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत.
वार्षिक प्राॅपर्टी टॅक्स,स्टोअरेज लायसेन्स,सर्व्हीस चार्जेस भरणा करण्यासाठी दोन्ही संस्थांकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे. नोटीसा बजावल्या जात आहेत.अशी तक्रार त्यांनी केली
एकीकडे महाराष्ट्र सरकार मॅगनेटीक महाराष्ट्र आणि नविन प्रकल्पाला आमंत्रण देत आहे आणि आहे ते उद्योग बंद पाडत आहे अशी आज डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची  धारणा झाली आहे असे मत “कामा “या संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published.