* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ओपन लँड टॅक्स प्रश्नी कल्याणात बिल्डर संघटनेचा पालिकेवर मोर्चा – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

ओपन लँड टॅक्स प्रश्नी कल्याणात बिल्डर संघटनेचा पालिकेवर मोर्चा

 (श्रीराम कांदु)
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून बांधकाम व्यावसायिकांना आकारण्यात   येणारा  ओपन लॅण्ड टॅक्स’ हा आसपासच्या इतर महापालिका च्या तुलनेत जास्त असल्याने महापालिका क्षेत्रातील बिल्डर वर्गात असंतोष पसरला होता .याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिकेकडून याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने बिल्डर वर्गात नाराजी पसरली होती या निषेधार्थ आज एम सी एच आय संघटनेने आज पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता यावेळी शिष्ट मंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेत आपले गार्हाणे मांडले .आयुक्तनी यावेली ओपन लँड टॅक्स इतर महानगर पालिकेच्या तुलनेत जास्त असल्याचे मान्य करत या रेट मध्ये सुधार करत सदर प्रस्तव महासभेसमोर पाठवण्यात आला आहे .प्रस्तव मंजुरी नंतर येत्या दोन महिन्यात त्याची अमलबजावणी करब्यात येईल असा आश्वासन दिले आहे .
            कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशांसकडून आकारन्यात येणारा  टॅक्सचा दर  इतर महानगर पालिकेच्या तुलनेत जास्त असून हि तफावत कमी करण्याची मागणी  अनेक वर्षांपासुन नागरिकांकडून केली जात आहे .कल्याण डोंबिवलीत ‘ओपन लँड टॅक्स’ (खुल्या जमीनीवरील कर) अन्य पालिकेच्या तुलनेत अवाच्या सवा असल्याने गृह प्रकल्पना फटका बसत असून  पालिकेचा कोट्यावधीचा कर बुडाला आहे.याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा या मागणीसाठी बिल्डरच्या एम सी एच आय या संघटने मार्फत पालिका प्रशासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार ,निवेदने दिली माञ प्रशासनाकडून आश्वासना पलीकडे काहीच ठोस निर्णय होत नसल्याने बिल्डर वर्गात नाराजीचा सूर आहे . मुळात खुल्या जमिनीवरील सुधारीत कर आकारणी बाबत २०१४ साली महासभेत ठराव मंजूर करुन प्रशासनाकडे पाठविला आहे. मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अखेर एम सी एच आय कडून  याच्या निषेधार्थ एमसीएचआय या बिल्डर संघटनेने लुटारू महापालिका म्हणून शहरात बॅनर लावत पालिकेच्या धोरणाचा निषेध करत आज पालिका मुख्यालयावर एम सी एच आय बिल्डर संघटनने तर्फे मोर्चा काढन्यात आला होता .शहरातील शेकडो बिल्डर सहभागी झाले होते .यावेळी मोर्चे कऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त पी वेलारसु यांची भेट घेत चर्चा केली यावेळी शिष्टमंडळाने ओपन लँड टॅक्स च्या दरात सुधारणा करन्याबाबत  ठोस निर्णय घ्या,थकबाकीसाठी अभय योजना राबवा अशी मागणी केली.
यावेळी आयुक्तांनी पी वेलारासु यांनी इतर महानगर पालिकेपेक्षा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा टॅक्सचा दर जास्त असल्याचे मान्य करत याबाबत इतर महानगर पालिकेचा अभ्यास  करत दरात सुधारणा करत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे .मंत्रालय स्तरावरून ही मुख्यमंत्र्यांनि निर्णय घेन्याच्या सूचना केल्या आहेत.या दरात सुधारणा करण्यासाठी महापौर गटनेते सभागृहनेते  यांच्याशी चर्चा करत पालिका प्रशासनाने अभ्यास करत  प्रस्ताव महासभेत समोर सादर केला आहे .येत्या 20 तारखेला होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव चर्चेसाठी सादर करण्यात आला आहे .आधी भरत असलेल्या टॅक्स दरा पेक्षा हा दर कमी आहे मात्र महासभेच्या मंजुरी नंतरच येत्या दोन महिन्यात अमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले .तर अभय योजना राबवण्याच्या मागणी बाबत आयुक्तनी शिष्टमंडळाला फटकारले .यावेळी बोलताना अभय योजना बाबत कमिटमेंट नाही ,अभय योजना फक्त ओपन लँड टॅक्स बाबत राबवता येणार नाही सर्व्ह बाबींचा अभ्यास करावा लागेल वेळ लागेल हे विषय वेगवेगळे आहेत .500 चौरस फुटांचे घर घेणारे नागरिक टॅक्स नियमित भरतात त्यामुळे तुम्हाला सवलत दिली तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही का ? अस सवाल करत अभय योजना बाबत कमिटमेंट नाही आशा शब्दत फटकारले .तर याबाबत एम सी एच आय चे पदाधिकरी रवि पाटील यांनी आयुक्तनी आम्हाला सदर प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले आहे हा प्रश्न मार्गी न लागलयास शांततेच्या मार्गाने  आंदोलन सुरू राहील असा इशारा दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *