ऑर्केस्ट्रा फेम दादूसच्या अंगावर किलोभर सोनं, तरीही वीजचोरी प्रकरणात न्यायालयीन कोठडी

ठाणे : भिवंडीत टोरंट पावर कंपनी व राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने कामतघरच्या निवासी भागात छापा टाकला. यावेळी पथकाने बिल्डरसह प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा फेमच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या वीजचोरांना पोलिसांनी अटक करून ठाणे जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता या दोघा वीज चोरांना २१ ऑगष्टपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. बिल्डर सचिन प्रभुलाल ठक्कर आणि ऑर्केस्ट्रा फेम संतोष उर्फ दादूस चौधरी अशी वीजचोर आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा :- ९ ऑगस्टला मराठा समाजातर्फे महाराष्ट्रात करण्यात येणारं आंदोलन नवी मुंबईत होणार नाही

भिवंडी शहरातील कामतघर येथे बिल्डर सचिन प्रभुलाल ठक्कर याने निवासी इमारतीच्या समोरील विद्युत वाहिनीला थेट केबल जोडणी केली होती. तो वीजपुरवठा ऑर्केस्ट्रा फेम संतोष उर्फ दादूस म्हात्रे यांच्या घरात जोडणी करून दिला होता. या वीजचोरीची तपासणी टोरेंटच्या भरारी पथकाने करून बिल्डर सचिन ठक्कर व संतोष म्हात्रे यांना ३ लाख ६६ हजार रुपये विद्युत अदा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र वीज बिलाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करू लागल्याने नारपोली पोलिसांनी या दोघांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी हजर केले. यावेळी त्यांनी न्यायालयातही वीजबिल जमा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे न्यायालयाने या दोघा वीज चोरांची रवानगी थेट ठाणे मध्यवर्ती कारागृहात केली आहे

हेही वाचा :- देशात तणावाच्या काळात सोशल मीडिया असलेल्या फेसबुक,व्हॉटअँप्स,व इंस्टाग्रामवर बंदी ?

न्यायालयाच्या कडक निर्णयामुळे चोरट्या विजचोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. भिवंडीतील चोरट्या वीजचोरी विरोधात टोरंट पावर कंपनी प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतल्याने वीज चोरांमध्ये धडकी भरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.