ऑनलाईन सायबर क्राइम रिर्पोटिंग पोर्टलला गती देण्याचे केंद्र गृहमंत्र्यांचे आवाहन

नवी दिल्ली दि.१९ – सायबर स्पेसमधील गुन्ह्यांमुळे निर्माण होणाऱ्या नव्या आव्हानांविरुद्ध केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज सावधानतेचा इशारा दिला आणि सायबर सुरक्षा सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. अवैध कारवायांसाठी समाज माध्यमांचा गैरवापर केला जात असल्याबद्दल त्यांनी गृहमंत्रालयाच्य आढावा बैठकीत चिंता व्यक्त केली. संवेदनशील क्षेत्रातील सुरक्षा मंजुऱ्यांच्या प्रस्तावाला गती दिल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली आणि या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी लागणारा सरासरी वेळ 120 दिवसांवरुन 53 दिवसांपर्यंत कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रस्तावांसाठी प्रशासकीय मंत्रालयाच्या समन्वयातून ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन मंजुरीचा वेळ आणखी कमी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लहान मुलांच्या अश्लिल चित्रणासाठी इंटरनेटचा गैरवापर होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन, त्यांनी ऑनलाईन सायबर क्राइम रिर्पोटींग पोर्टल लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले. यामुळे राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील पिडित लोकांना तक्रार नोंदवता येईल आणि संबंधित कायदा अंमलबजावणी संस्था तपास सुरु करतील.

सायबर धोक्यांबाबत अधिक सजग राहण्याचे आवाहन राजनाथ सिंग यांनी केले. तसेच गृहमंत्रालयांतर्गत सर्व संघटनांच्या माहिती तंत्रज्ञान व्यवस्थेचे नियमितपणे सायबर लेखा परिक्षण करण्याची सूचना केली.

गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email