एसी लोकल पाहण्याची संधी

एसी लोकल *सोमवार* ते *शुक्रवार* अशी पाच दिवस चालणार असून *शनिवार-रविवारी* या लोकलला विश्रांती दिली जाणार आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात *सीसीटीव्ही, अग्निशमन* यंत्रे असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाने दिली आहे. सोमवारी प्रवाशांसाठी पहिली सेवा *अंधेरी ते विरारपर्यंत दुपारी २.१० वाजता सुरू होणार आहे*. त्यानंतर नियमित फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.

*प्रवास तिकीटदर* (अंदाजित)

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ६० रु.

चर्चगेट ते दादर ९० रु.

चर्चगेट ते वांद्रे ९० रु.

चर्चगेट ते अंधेरी १३५ रु.

*चर्चगेट ते बोरिवली १८५ रु.*

चर्चगेट ते भाईंदर २०५ रु.

चर्चगेट ते वसई २१० रु.

*चर्चगेट ते विरार २२० रु.*

गाडीचा वेग : *११० किमी प्रतितास*

प्रवासी क्षमता : *५,९६४ आसने : १,०२८*

*असे आहे वेळापत्रक*

एसी लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार असून फक्त सकाळची पहिली फेरी धिम्या मार्गावर चालेल. ही लोकल महालक्ष्मी स्थानकातून सकाळी ६.५८ वाजता सुटेल आणि बोरिवलीला धिम्या मार्गावरून स. ७.५० वाजता पोहोचेल. बोरिवलीहून चर्चगेटपर्यंतची जलद सेवा स. ७.५४ वाजता सुटणार आहे.

*बोरिवली (स. ७.५४) ते चर्चगेट (स. ८.५०)*

चर्चगेट (स. ८.५४) ते विरार (स. १०.१३)

*विरार (स. १०.२२) ते चर्चगेट (स. ११.१६)*

चर्चगेट (स. ११.५०) ते विरार (दु. १.०५)

*विरार (दु. १.१८) ते चर्चगेट (दु. २.४४)*

चर्चगेट (दु. २.५५) ते विरार (दु. ४.१२)

*विरार (दु. ४.२२) ते चर्चगेट (सायं. ५.४२)*

चर्चगेट (सायं. ५.४९) ते बोरिवली (सायं. ६.४१)

*बोरिवली (सायं. ६.५५) ते चर्चगेट (सायं. ७.४४)*

चर्चगेट (सायं. ७.४९) ते विरार (रा. ९.१५)

*विरार (रा. ९.२५) ते चर्चगेट (रा. १०.४८)*

 

*एसी लोकल पाहण्याची संधी*

पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना एसी लोकल पाहता यावी यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एसी लोकल उभी करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ही लोकल मुंबईकर पाहू शकणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email