एसटीमधील प्रवाशाचा मोबाईल चोरणारा गजाआड

प्रवाशानी प्रसंगावधान राखत पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात 

कल्याण – एसटी मध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशाचा मोबाईल चोरून पळ काढणाऱ्या चोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना कल्याण एसटी डेपो आगारात घडली.महात्मा फुले पोलिसांनी या चोरा विरोधात गुन्हा दाखल करत त्याला  अटक केली आहे .  इस्तीयाज शेख असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून तो भिवंडी येथे राहणारा आहे .अंबरनाथ येथे राहणारे दिलीपसिंग साळुंखे ५५ हे काल रात्री  दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या आई वडिलांना नाशिक येथे जाणाऱ्या एसटी बस मध्ये बसवण्यासाठी कल्याण एसटी आगारात आले होते .रात्री दीड वाज्ण्याच्य्या सुमारास त्यांना मुरुड  शिर्डी बसमध्ये बसवून देत असतांना झालेल्या गर्दीचा फायदा घेत .  इस्तीयाज शेख या चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईळ चोरून पळ काढला मात्र मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात आल्याने साळुंखे यांनी आरडाओरड केल्याने आसपासच्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत या चोरट्याला पाठलाग करत पकडून महत्मा पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी .  इस्तीयाज शेख या चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे. 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email