एम.आय.डी.सी. कडून फेरीवाल्यांवर कारवाई;मनपा अधिका-यांंमूळे अनेक फेरीवाले कारवार्ईपासुन बचावले

डोंबिवली – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारा सध्या डोंबिवली क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांंधकाम आणि अनधिकृत फेरीवाले हटवायची मोहीम चालवली जात आहे. या नुसार महामंडळच्या वतीने डोंबिवलीतील ३०० पेक्षा अधिक अनधिकृत निर्माणकर्ता आणि अवैध कब्जेदाराना नोटिस देण्यात आली आहे. या सोबत महामंडळाने आपले कार्यालयाच्या समोर असलेल्या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवलंं गेल आहे. १० दिवसांंपूर्वी महामंडळातर्फे डोंबिवलीमध्ये स्थित असलेल्या कार्यालयाच्या  समोर अतिक्रमण विरोधी कार्रवाई करण्यात आली होती आणि येथील पेंढारकर महाविद्यालयच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूच्या बेकायदेशीरपणे चालत असलेल्या खाद्यपदार्थच्या स्टॉलना ह्वटले गेले . पण या दरम्यान कल्याण डोंबिवली महानगर पालिकाचे अधिकारी डोंबिवलीच्या महामंडलळच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी औद्योगिक महामंडळाच्या अधिका-यांसोबत चर्चा केली आणि त्यांना आपल्या सीमा मध्ये राहुन कारवाई करण्याची सुचना केली. औद्योगिक महामंडळ सूत्रांच्या नुसार मनपा अधिका-यांनी त्यांना सांंगितले की औद्योगिक महामंडळचे अधिकृत क्षेत्र पेंढारकर कॉलेजच्या डाव्या बाजूनी आहे आणि औद्योगिक महामंडळ उजव्या बाजूनी असलेल्या स्टॉलवर कारवाई करू शकत नाही मनपा अधिकाऱ्यांंच्या या सुचनेच्या नंतर औद्योगिक महामंडळाचे अधिकारी ही घाबरून गेले आणि त्यांनी पेंढारकर महाविद्यालयच्या फक्त डाव्या बाजूला कारवाई केली . पण येथुन फक्त १० मीटर दुर  दुसऱ्या बाजूला असलेल्या फेरीवाल्याना मनपा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे बिनधास्त आपला धंधा चालवत आहे. गेल्यावर्षी पावसानंतर येथीलच्या घरडा सर्कल पासून सुयोग हॉटेल विक्को नाका पर्यंतचा रस्ताची दयनीय स्थिति होती. पूर्ण रस्त्या वर खड्डे च खड्डे होते. पण या दुरुस्तीसाठी कल्याण मनपा प्रशासनाने  हा रस्ता औद्योगिक महामंडळा च्या अधिकार क्षेत्र मध्ये आहे सांगत आपले हाथ वर केले होते पण फेरीवाल्याना संरक्षण देण्यासाठी मनपा अधिकारी हे क्षेत्र आपले असल्याचे  सांगत आहेत. यामूळे औद्योगिक क्षेत्रच्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यात नाराजीच वातावरण पसरलं आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email