एमआरआय मशीनमध्ये खेचला जावून तरुणाचा मृत्यू
मुंबई –नायर रुग्णालयात दुर्लक्षित कारभारातुन एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. राजेश मारू असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून एमआरआय मशीनमध्ये खेचला गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
आपल्या आईचा एमआरआय काढण्यास गेलेल्या राजेशला वॉर्डबॉयने ऑक्सीजन सिलेंडर एमआरआईय रूममधे आणायला सांगितला. एमआरआईय मशीनद्वारे चुम्बकीय क्षेत्र निर्माण होत असल्याने तेथे धातुच्या वस्तु नेणे धोकादायक असते. कुटुंबीयांनी विरोध करताच वॉर्डबॉयने मशीन बंद असल्याचे सांगितले.यानंतर राजेश सिलेंडर आणायला गेला व ऑक्सीजन सिलेंडर घेवुन येताच एमआरआय मशीनने त्याला सिलेंडरसकट आत खेचून घेतले.या घटनेत गंभीर जखमी झाल्याने उपचारदरम्यान राजेशचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या दुर्लक्षित कारभारातुन राजेशला आपला जीव गमवावा लागला असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. आगरीपाड़ा पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत डॉक्टर सिद्धार्थ शाह, वॉर्ड बॉय विट्ठल चव्हाण, महिला वॉर्ड अटेंडेंट सुनीता सुर्वे या तिघांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांनी राजेश मारू यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये भरपाई दयायची घोषणा केली आहे.