एप्रिल फुल,डब्बा गुल, कधी बांधणार पत्री पुल मनसेचं कल्याणच्या पत्री पुलावर ठिय्या आंदोलन !!!
राममंदिराचं नंतर बघा, आधी पत्री पूल बांधा !!!
वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी
कल्याणच्या पत्री पुलाचं काम संथगतीनं चाललं असल्याचा आरोप करत मनसेनं आज ठिय्या आंदोलन केलं. पत्री पुलाच्या कामामुळे कल्याण-डोंबिवलीकर वाहतूक कोंडीने त्रस्त झाले असून त्यांची या त्रासातून सुटका करण्याची मागणी मनसेनं केली आहे.
धोकादायक बनलेला कल्याणचा पत्री पूल सप्टेंबर महिनाअखेरपासून पाडायला सुरुवात करण्यात आली होती. दीड महिन्यात हा पूल पूर्ण पाडून त्याजागी पुढच्या तीन महिन्यात नवीन पूल उभारण्याचं आश्वासन एमएसआरडीसीने दिलं होतं. मात्र आता दीड महिना होत आला, तरी पत्री पुलाचं पाडकाम झालेलं नसून काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
यामुळे बाजूच्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक होत असल्यानं नेहमीच मोठी वाहतूक होत असते. याविरोधात मनसेनं आज जुन्या पत्री पुलावरच ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात मनसेचे शेकडो कार्यकर्ते काळे कपडे घालून सहभागी झाले होते. यावेळी राममंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा, आधी उपरोधिक टीका मनसेनं केली. राज्य सरकार, पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, केडीएमसी यांच्याविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पत्री पुलाच्या कामाला गती न मिळाल्यास यापुढचं आंदोलन उग्र स्वरूपाचं असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
काळे कपडे घालवु केलेल्या ठिय्या आंदोलनाला क.डों.म.पा. आयुक्त गोविंद बोडके,DCP डाॅ.संजय शिंदे,MSRDC चे अभियंता जैस्वाल यांनी भेट दिल्यावर सदरचे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.
सदर आंदोलनात मनसे सरचिटणीस प्रकाश भोईर,प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत,कल्याण शहरअध्यक्ष कौस्तुभ देसाई,जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर,उल्हास भोईर,मंदार हळबे,प्रल्हाद म्हात्रे,महिला सेनेच्या मंदाताई पाटील,उर्मिला तांबे,शितल विखणकर,नगरसेविका सरोज भोईर,अनंता गायकवाड,राजन मराठे,अनंता म्हात्रे,गजानन पाटील,हरी पाटील,तकदिर काळण,सोमनाथ पाटील,सागर जेधे,राहुल कामत,सुदेश चुडनाईक याचबरोबर कल्याण डोंबिवली क्षेत्रातील शेकडो मनसैनिक उपस्थित होते.