एका ९ वर्षीय चिमुकलीवर सख्या बापानेच केला बलात्कार

एका ९ वर्षीय चिमुकलीवर सख्या बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपी संदीप सुभाष महाजन याला अटक करुन कारवाई सुरु केली आहे. पीडित मुलीची आई घराघरात धुणीभांडी करते. नेहमीप्रमाणे ती कामाला गेली होती. सायंकाळ होताच पीडित मुलगी शाळेतून घरी आली. तिला आणखी दोन भाऊ आहेत. ते बाहेर खेळत होते. मुलगी घरात एकटी असल्याचं लक्षात घेत दारुडा बाप संदीप सुभाष महाजन (४५) याने आपल्या सख्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला मारहाण केली.

यानंतर रात्री पीडितेची आई घरी आल्यानंतर दारूच्या नशेत त्याने तिलाही जबर मारहाण केली आणि मुलांसह घराबाहेर हाकलून दिलं. रात्रभर आई, पीडिता आणि तिचे दोन भाऊ हे गावच्या मंदिराजवळ झोपले होते. सकाळ होताच पीडित मुलीची तब्येत बिघडली. तिला तिच्या आईने काय झालं विचारलं असता हा सगळा गंभीर प्रकार समोर आला. यानंतर या प्रकरणासंबंधी पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे तर पीडित मुलीला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या सध्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिल संदीप महाजनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खामगाव तालुक्यातील सुटाला खुर्द गावात हा लज्जास्पद बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email