एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या शाळेतील वायरमनने केला बलात्कार
दिल्ली दि.१३ – एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या शाळेतील वायरमनने बलात्कार केल्याची ध्क्क्दायक घटना दिल्लीत घटली असून पीडित मुलगी इयत्ता दुसरीमध्ये शिकत होती.आरोपीने तिला फूस लावून पळवलं आणि शाळा परिसरातील गोल मार्केट येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी हा तिच्या शाळेत वायरमननचे काम होता. बुधवारी रात्री पीडित मुलीची तब्येत अचानक खराब झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर तिने झालेल्या प्रकाराबद्दल सर्व हकिकत कुटुंबीयांनी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला आणि त्या आधारावर आरोपीला अटक केली.