एका रात्रीत तीन दुकाने फोडली – डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.२८ – कल्याण डोंबिवली मध्ये चोरट्यांचा सुळसूळाट झाला असून बंद घरे दुकाने फोडण्याचा सपाटा चोरट्यांनी लावला असून या चोरट्यांच्या वाढत्या कारवायामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास मानपाडा रोड वरील लागोपाठ तीन दुकाने फोडून चोरट्यांनी हजारोंचा मुद्देमाल लंपास केला.
डोंबिवली पूर्वेकडील संदप गाव येथे सूर्यदेव बंगल्यात राहणारे प्रवीण पाटील यांचे मानपाडा रोड वर प्रविशा इन्शुरन्स सेंटर नावाने कार्यालय आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजता नेहमी प्रमाणे ते कार्यलय बंद करून घरी निघून गेले. रात्रीच्या वेळी कार्यालयाला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या छताचा पत्रा फोडून आतमध्ये प्रवेश करत दुकानातील 30 हजार रुपयांची रोकड लांबवली तसेच शेजारी असणारे मखनाराम प्रजापती यांच्या रामदिन मोबाईल शॉप यांच्या दुकानातून ४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल तर या दुकानांना लागून असलेळे प्रशांत राठोड यांच्या दुर्गेश गरेज मधून 10 हजारांची रोकड लंपास करत तेथून पळ काढला. सकाळी नऊ वाजता या दुकानांत चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.