‘एकता दौड’ला केंद्रीय गृहमंत्र्यांकडून हिरवा झेंडा राष्ट्राच्या ऐक्यासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा करुया- राजनाथ सिंह
दिल्लीतल्या ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम इथून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज ‘एकता दौड’ ला हिरवा झेंडा दाखवला. शेकडो युवक, बालके आणि ज्येष्ठ नागरिकही यात सहभागी झाले होते. यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देण्यात आली.
हेही वाचा – दुचाकीस्वारांनी 12 लाखाची रोकड लंपास केली
भारताच्या स्वातंत्र्यानंतर, विविध संस्थाने भारतात विलीन करण्याच्या सरदार पटेल यांच्या बहुमोल कार्याचे राजनाथ सिंह यांनी स्मरण केले. भारताची एकता आणि अखंडता यामागे सरदार पटेल यांचे कार्यबळ होते, राष्ट्र त्यांचे ऋणी राहील असे गृहमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. याआधी केंद्रीय गृहमंत्र्यांनी पटेल चौक येथे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली.
Please follow and like us: