उस्मानाबाद जिल्हयातील एका महिलेने मंत्रालयाच्या प्रवेद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न
(म.विजय)
उस्मानाबाद दि.२६ – उस्मानाबाद जिल्हयातील एका महिलेने काल मंत्रालयाच्या प्रवेद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी वेळेत या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
सावकारी जाचाला कंटाळून उस्मानाबाद जिल्हयातील अलका कारंडे ( वय ३९ ) या महिलेने काल सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वाराजवळ बाटलीतून आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलीसांनी या महिलेला ताब्यात घेवून मरीन ड्राईव्ह पोलीसांच्या ताब्यात दिले असून, मरीन ड्राईव्ह पोलीस पुढील तपास करीत आहेत. या महिलेले या संदर्भात स्थानिक प्रशासन यासंदर्भात निवेदनाद्वारे इशारा दिला होता.
Please follow and like us: