उसने दिलेले पैसे तीन दिवसांनी देतो सांगितल्याने मारहाण ,डोंबिवलीतील घटना

डोंबिवली – उसने दिलेले पैसे परत मागितले असता तीन दिवसांनी देतो असे सांगितल्याने राग आलेल्या व्याक्तिने मारहाण केल्याची घटना डोंबिवली शहरात घडली. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्वेतील कोकण किनारा हॉटेलमध्ये नवीन गौडा राहत होता. संत्या ऊर्फ कालू हा गुरुवारी रात्री ९ च्या सुमारस दरम्यान येऊन त्याच्याकडे उसने दिलेले पैसे मागायला लागला नवीनने त्याला तीन दिवसांनी देतो असे सांगताच सत्या ऊर्फ कालू यांने हत्याराने त्याला मारहाण केली.या प्रकरणी सत्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email