उपलब्ध नैसर्गिक साधन सामुगीचा योग्य उपयोग व्हायला पाहिजे ; रामदास आठवले
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – शेतीचे राष्ट्रीयकरण व्हायला पाहिजे. त्याच बरोबर नैसर्गिक साधन सामुगी उपलब्ध आहे त्याचा योग्य उपयोग व्हायला पाहिजे. त्यामुळे देशाचा आर्थिक विकास होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला नदी जोड प्रकल्प पूर्ण झाल्यास भारताच्या सर्व नद्या एकत्र केल्या जातील. त्यामुळे ज्या भागात पाणी पोहचत नाही त्या भागात पाणी पोहोचण्यात मदत होईल असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी डोंबिवलीत केले.
पूर्वेकडील प्रगती महाविद्यालयात संसाधनाच्या मर्यादा आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर राष्ट्रीय परीसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. परिसंवादाचे उद्घाटन आठवले यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी भाजपा नेते तथा माजी मंत्री जगनाथ पाटील, प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक महाजन, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. विष्णू मगरे, हैद्राबाद उस्मानिया विद्यापीठाचे डॉ. पॅट्रिक, डॉ. संजय सैनी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आठवले पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी मांडलेल्या अर्थशास्त्र सिद्धांतावर भारताचा आर्थिक विकास होत आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास त्याच पद्धतीची आर्थिक समानता देशात प्रस्थापित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहते. शेतीचे राष्ट्रीयकरण व्हायला पाहिजे. त्याच बरोबर नैसर्गिक साधन सामुगी उपलब्ध आहे त्याचा योग्य उपयोग व्हायला पाहिजे. त्यामुळे देशाचा आर्थिक विकास होईल. अमेरिका, इंग्लंड सारख्या देशांसोबत भारत आर्थिक महासत्ता होण्याचा प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत. भारतात सामाजिक समतेसोबत आर्थिक समता कशी प्रस्थापित होईल याचे अर्थशास्त्रज्ञानी संशोधन करावे.
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव व रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा परिसंवादापूर्वी सत्कार केला.