उद्धव ठाकरे-शरद पवारांची गुप्त भेट
(विजय दुर्गे )
मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आहे. सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. दहा दिवसांपूर्वी झालेल्या या बैठकीला शरद पवारांनी देखील दुजोरा दिला आहे. या भेटीबाबत उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी शरद पवारांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पवारांनी या वृत्ताला दुजोरा दिल्यामुळे या भेटीचं महत्त्व प्रचंड वाढलं आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींची भेट घेतली होती
Please follow and like us: