उत्तर प्रदेशात बहारीच आणि खलिलाबाददरम्यान नव्या रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, दि.२४ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या वित्तीय व्यवहार विषयक समितीने उत्तर प्रदेशात बहारीच आणि खलिलाबाददरम्यान नवा रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

बहारीच, बलरामपूर, श्रावस्ती, सिद्धार्थनगर आणि संत कबीर नगर या तुलनेने मागास जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. या रेल्वेमार्गामुळे 57.67 लाख थेट रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी 4939.78 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा रेल्वे मार्ग 2024-25 पर्यंत पूर्ण होईल.

हा रेल्वेमार्ग गौतम बुद्धांच्या जीवनकार्याशी संबंधित श्रावस्ती या भागातून जात असल्यामुळे या भागात पर्यटनालाही चालना मिळेल. श्रावस्ती हे जैन समुदायासाठी महत्त्वाचे तिर्थस्थळ आहे. तसेच दुर्गादेवीच्या देवी पाटण मंदिरापर्यंत हा रेल्वे मार्ग जात असल्यामुळे या भागात धार्मिक पर्यटनाला चालना देण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.