उघड्या नाल्यात पडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
मुंबई – मुंबईतील उघडे नाले आणि उघडे मॅनहोल यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंधारात नाला न दिसल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील कुर्ला परिसरात घडली असून ही घटना शुक्रवारी रात्री ११ च्या दरम्यान घडली. मृत्यू झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण कुर्ला परिसरात रात्रीच्या वेळी फिरत होता. मात्र अंधारात नाला न दिसल्याने तो नाल्यात पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Please follow and like us: