उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हात गाड्यावर पोलिसांची धड़क कारवाई

(श्रीराम कांदु)

कल्याण दि.२५ – उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण डोंबिवली येथील मुख्य रस्त्यावर चौकामध्ये खाद्य पदार्थाच्या हातगाड्या बिन दिक्कतपणे चालविल्या जात आहेत. याबाबत अनेकदा दक्ष नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. हे हातगाडी चालक अत्यंत निष्काळजीपने तसेच नित्कृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ विकन्याचे काम बिनदिक्कत करतात पोलिसांनी अशा निष्काळजीपने उघड्यावर खाद्यपदार्थ विकून नागरिकाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या चायनीज ,वडापाव गाड्याविरोधात धड़क कारवाई सूरु केली आहे.

डोंबिवली येथील स्काय वॉक खाली शशी तेवर व पिंट्या उर्फ अनंत पाटील हे दोघे इडली डोसा तसेच इतर खाद्यपदार्थ विक्री ची हात गाडी लावत होते या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी मानवी जीवितास धोका निर्माण होईल धोका निर्माण होईल तसेच ज्वालाग्रही शेगडीवर खाद्यपदार्थ तयार करत खाद्य पदार्थ उघड्यावर ठेवून मानवी जीवितास आरोग्यास अपायकारक होईल अशा पद्धतीने वीणापरवानगी विक्री करत असल्याचे आढळून आले.

यामुळे डोंबिवली पोलिसांनी शशी तेवर व पिंट्या उर्फ अनंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी कारवाई सुरु केली असली तरी महापालिका प्रशासनाकडून मात्र अशा खाद्य पदार्थांच्या गाड्यावर कारवाई करिता हात आखडता घेत असल्याचे दिसून येत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email