इमारतीच्या टेरेसवर गृहस्थाची आत्महत्या 

डोंबिवली – एका ४५ वर्षीय इसमाने इमारतीच्या टेरेसवर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडे घडली. या घटनेची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

  निलेश प्रभाशंकर गौर ( ४५ ) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असून तो डोंबिवली पूर्वेकडील टिळक रोडवरील  ब्राम्हणसभेच्या जवळील शिवकृपा अपार्टमेंट मध्ये राहत होता. रविवारी रात्री ब्राम्हणसभेच्या टेरेसवर शेडच्या लोखंडी रॉडला केबल वायरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती सोमवारी सकाळी रामनगर पोलिसांना समजली. निलेश यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कपडे करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email