इन्कम टॅक्स ची रेड पडल्याचे सांगत मदतीच्या बहाण्याने २ लाख ६९ ह्जारांचे दागिने लांबवले – डोंबिवलीतील घटना

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१० – इन्कम टक्स ची रेड पडल्याचे सागत मदतीची विनवणी करत एका तरुणीकडून २ लाख ६९ ह्जारांचे दागिने लांबवण्यात आल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात विशाल अग्रवाल व सोनिया सोनवणे या दोघा विरोधात गुन्हा दखल करत विशाल ला अटक करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड परिसरात नामदेव पाटीलवाडी शिव अमर्त इमारती मध्ये राहणारे जॉर्ज नाजरथ यांच्या महिला मे महिन्यात पाथर्ली येथे राहणाऱ्या विशाल अग्रवाल व सोनिया सोनावणे या दोघांनी आमच्या कडे इन्कम टॅक्स ची रेड पडली आहे अशी भूलथाप देत आम्हाला पैशाची मदत कर तीन दिवसात परत करतो पैसे नसतील तर सोन्याचे दागिने दे अशी विनवणी केली. मदतीच्या भावनेतून जॉर्ज याच्या मुलीने तब्बल 2 लाख २६९ हजार ७३० रुपये किमतीचे दागिने त्यांना देवू केले. महिनाभराचा कालावधी उलटला मात्र त्यांनी दागिने परत न केल्याने जॉर्ज यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असुन या तक्रारी नुसार पोलीसानी विशाल अग्रवाल व सोनिया सोनवणे या दोघा विरोधात गुन्हा दखल करत विशाल ला अटक करत फरार सोनियाचा शोध सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.