इंडियन फेस्टिवल ऑफ आर्ट २०१८”, कल्याण

(श्रीराम कांदु)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून “इंडियन फेस्टिवल ऑफ आर्ट २०१८” चे आयोजन कल्याण येथे करण्यात आले आहे.

कल्याण – डोंबिवली व ठाणे विभागातील युवा विध्यार्थ्यांच्या कलागुणांना या द्वारे व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे.

दि. २३, २४ आणि २५ जानेवारी रोजी, कल्याण येथील लाल चौकी परिसरात फडके मैदान येथे हा कला मोहत्सव रंगणार आहे.

नृत्य, अभिनय, गायन, स्किट, माईम इ. कला प्रकार सादर होणार असून चित्रकला, फोटोग्राफी, रांगोळी, पोस्टर मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

पारंपरिक ढोल – ताशा स्पर्धा, बँड स्पर्धा ह्याचा देखील समावेश ह्या कलामोहत्सवात आहे.

२३ जानेवारी, सायंकाळी ६ वाजता राज्यमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण व काही प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा रंगणार आहे.
तत्पुर्वी स. १० वा. कला प्रदर्शनीचे उद्घाटन होईल.

दि. २५ जानेवारी, सायं. ७ वाजता बक्षिस समारंभ आणि कार्यक्रमाचा समारोप असेल. सारेगमप विजेते व कल्याणचे नागरिक असलेले श्री. नचिकेत लेले ह्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

नृत्य, अभिनय इ. स्पर्धांच्या ऑडिशन्स पूर्ण झाल्या असून निवडले गेलेले स्पर्धक, मुख्य कार्यक्रमात आपली कला सादर करतील.
या निमित्त कल्याण –  डोंबिवलीतील उदयोन्मुख कलाकारांचे कला प्रदर्शन भरवण्यात येणार असून, त्यात रांगोळी, चित्रकला, फोटोग्राफी ह्याचा समावेश आहैै

सर्व विद्यार्थी, युवा कलाकार, कलाप्रेमी नागरिक यांनी या कलामोहत्सवास आवर्जुन भेट द्यावी.अश्या आवाह्नन अभाविप, डोंबिवलीचे पदाधिकारी मिहिर देसाई यानि केली आहे।

 

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email