आळंदीमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या

पिंपरी-चिंचवड – आज पावणे पाचच्या दरम्यान आळंदी नगरपालिकेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या केल्याची घटना समोर आली असून चार ते पाच जणांच्या टोळक्यानं कांबळे यांच्यावर कोयत्यानं वार केले. आळंदीमध्ये अंबर बस स्टॉपजवळ बालाजी कांबळे यांची हत्या करण्यात आल्याची महिती मिळत आहे. कांबळे यांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचरापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले बालाजी कांबळे यांच्या हत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. बालाजी कांबळे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढली होती. घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी वायसीएम रुग्णालयात धाव घेतली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email