आर्थोवेद हाँस्पिटलतर्फे आयुर्वेदाच्या प्रसारासाठी “आयुर्प्रबोध” कार्यक्रम
( श्रीराम कंदु )
जनसामान्यांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी क-हाडे ब्राह्मण सेवा मंडळ व आर्थोवेद हाँस्पिटल तर्फे आयुर्प्रबोध कार्यक्रम समाजमंदिर हाँल टिळक नगर डोंबिवली पूर्व येथे रविवार,दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर, अस्थिघनता चाचणी, केसांची कंपुटर मशिनद्वारे तपासणी,नाडी परिक्षण, गुदद्वार परिक्षण मोफत करण्यात येईल. त्याचप्रमाणे व्याखाने, रुग्णांनुभव, आयुर्वेद पंचकर्म यावरील चलतचित्रफिती आणि चर्चासत्र, वैद्यकीय सल्ला, मोफत अग्नी विद्ध चिकित्सा औषध विक्री करण्यात येणार असल्याची माहिती आर्थो वेद हाँस्पिटल वतीने देण्यात आली आहे.
Please follow and like us: