आय .ए.एस .अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या नवरा बायकोला खंडणी पथकाकडुन अटक:-
(म विजय )
आय .ए.एस .अधिकारी मोपलवार यांचे त्यांच्या पत्नि बरोबर डिवोर्सचे प्रकरण सुरू होते ,त्या संदर्भात त्यांनी सतीश मांगले या प्रायव्हेट डीटेक्टिवची मदत घेतली होती त्या वेळी मांगले याने त्यांची भ्रष्टाचार बाबत एक ऑडीओ क्लिप बनवली व ती 1/8/2017 रोजी एका व्रूत्तवाहिनीवर प्रसारित केली होती ,त्या नंतर सतीश मांगले व त्याची दूसरी बायको श्रद्धा मांगले ह्या विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांना भेटून तसेच प्रसार माध्यमांचा प्रतिनिधींना भेटून सातत्याने आरोप करत होते ,तसेच अनेक शासकीय कार्यालयात मोपलवार यांच्या विरोधात तक्रारौ केल्या होत्या ,त्यानंतर 23 ऑक्टोबर् 2017 रोजी सतीश मांगले त्याची पत्नि श्रद्धा मांगले व मित्र अनिल वेद मेहता यांनी श्री मोपलवार यांच्या ओळखीचा श्री .क्लिंग मिश्रा याचे मार्फत संपर्क साधून त्यांना नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे बोलावून तेथे राधेश्याम मोपलवार यांचे विरुद्ध केलेले सर्व भ्रष्टाचाराचे आरोप परत घेण्या साठी व स्वतःहा कडे असलेले कॉल रेकॉर्डिंग परत करण्यासाठी त्यांच्या कडे 10 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली दिनांक 31/10/2017 रोजी सतीश मांगले याने आपली पत्नि श्रद्धा मांगले हिच्या सह अँधेरी येथील जे .ड्ब्लु .मेरीअट येथे रात्री 8 ते 9 वाजता मोपलवार यांच्याशी चर्चा करून 7 कोटी रुपया पर्यंत तडजोड करण्यास सांगितले ,7 कोटी रुपये न दिल्यास तसेच पोलीसात तक्रार केल्यास श्री मोपलवार व त्यांची मुलगी तन्वी या दोघांना गुंडानकडून ठार मारण्याची धमकी दिली ,काल दिनांक 2/11/2017 रोजी जबरदस्तीने मागीतलेल्या 7 कोटी रुपये खंडणीच्या रकमे पैकी 1 कोटी रुपयांची रक्कम सतीश मांगले याने भाड्याने राहत असलेल्या घरी डोबिवली पूर्व मानपाडा निळजे लोढा ,रिव्हर व्हयुव एफ सतरावा माळा फ्लॅट नबंर 1701 येथे स्विकारताना त्यास ठाणे खंडणी विरोधी पथकाने रँगेहाथ पकडले त्यांच्या कडून दोन लॅपटॉप ,5 मोबाईल हॅन्डसेट ,4 पेनड्राइव ,15 सी.डी.व अनेक आक्षेपार्ह कागद पत्रे मिळाली आहेत , सतीश मांगले याचे 10 वी पर्यंत शिक्षण झाले आहे ,त्याने कॉम्पुटर मधे डिप्लोमा केलेला आहे परंतु तो सुद्धा त्याने अर्धवट सोडून प्रायव्हेट डीटेक्टिवचे काम सुरू केले होते ,त्यास वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संबंध ठेऊन त्यांचे फोनवरिल संभाषण रेकॉर्डिंग करण्याची सवय आहे ,त्याच्या विरुद्ध बाँद्रा पोलीस स्टेशन येथे आय .टी .अॅक्ट नुसार 74/2017 तसेच खंडणीचा गुन्हा दाखल आहे ,तसेच मीरा रोड येथे बलात्काराचा गुन्हा दाखल आहे .त्याच्या बरोबर अजून दोन आरोपीना अटक होण्याची शक्यता आहे पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा करत आहेत .