आमदार संजय केळकर यांना राष्ट्रीय सैनिक संस्थेतर्फे मानद कमांडर पदवी प्रदान

आमदार संजय केळकर यांना राष्ट्रीय सैनिक संस्थेतर्फे मानद कमांडर पदवी प्रदान

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना राष्ट्रीय सैनिक संस्थेनं मानद कमांडर ही पदवी प्रदान केली आहे.लेफ्टनंट जनरल समन्वार आणि पोलीस महानिरिक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते लष्करी गणवेश देऊन केळकर यांचा गौरव करण्यात आला. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनाही याच सन्मानाने गौरवण्यात आले. सैनिकी शाळेत शिक्षण घेतले तरी लष्करात दाखल होऊन देशसेवा करता आली नाही. पण राष्ट्रीय सैनिक संस्थेनं आपल्याला कमांडर या पदवीनं सन्मानित केल्यानं आपली इच्छा पूर्ण झाल्याच्या भावना संजय केळकर यांनी व्यक्त केल्या. १६ डिसेंबर विजयी दिन म्हणून साजरा केला जातो. सह्याद्री प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय सैनिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं १९७१ च्या भारत-पाक युध्दात विशेष पराक्रम करणारे जवान अधिकारी आणि त्यांच्या वीरपत्नी अशा २० जणांचा या समारंभात सन्मान करण्यात आला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email