आपले सरकार सेवा केंद्र सुरु करायचे? २३ एप्रिलपर्यंत संपर्क साधा

ठाणे – आपले सरकार सेवा केंद्र ठाणे जिल्ह्यात सुरु करण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नावे मागिवली आहेत.http://thane.nic.in या संकेतस्थळावर जाऊन ज्या ठिकाणी अशी केंद्रे कार्यरत नाहीत त्यांची यादी पहावयास मिळेल. सध्या जिल्ह्यात ५४९ आपले सरकार सेवा केंद्रे आहेत.

शहापूर तालुक्यात २६, मुरबाड ५९, कल्याण १७, भिवंडी २१ अशा १२३ केंद्रांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. याशिवाय सध्या ठाणे मनपा क्षेत्रात १४३, मीरा भाईंदर ७१, नवी मुंबई पालिका ७८, कल्याण डोंबिवली पालिका ९४, भिवंडी निझामपूर ५२, उल्हासनगर १०, अंबरनाथ नगरपरिषद २०, बदलापूर नगर परिषद ६ , मुरबाड आणि शहापूर अनुक्रमे १ आणि ६ अशी केंद्रे देखील रिक्त आहेत.

इच्छुकांनी आपापल्या प्रांत किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून विहित नमुना आणि प्रतिज्ञापत्र भरून द्यावे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email