आपत्कालीन यंत्रणांना दक्षता बाळगण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

ठाणे – मुंबई, ठाण्यासह सर्वत्र पुढील ४-५ दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तवल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला जय्यत तयारीत राहाण्याचे निर्देश ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे सीईओ, जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेच्या सीईओ, सार्वजनिक बांधकाम खाते, एमएमआरडीए, एमएसआरडीसीचे अधिकारी आदींशी श्री. शिंदे यांनी चर्चा करून त्यांना विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये भरल्यावर खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे खड्ड्यांची गांभीर्याने नोंद घेऊन त्वरित खड्डे बुजवण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी आहेत. खड्ड्यांच्या बाबतीत लोकांच्या तक्रारी आल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित खड्डे बुजवण्यासाठी पावले उचलावीत, असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्याचा धोका आहे. जिल्ह्यात धोकादायक इमारतींचा प्रश्नही गंभीर असून इमारत कोसळून जीवितहानी होऊ नये, याबाबतीतही सतर्कता बाळगण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले आहेत. पर्यटनस्थळी, विशेषत: धबधबे आणि तलावांजवळील सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे निर्देशही त्यांनी दिले असून पालिका, पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ या सर्व यंत्रणांनी समन्वय राखण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email