आधार कार्डच्या बहाण्याने घरात घुसून हजारोंचा मुद्देमाल लंपास
कल्याण – कल्याण शहरात चोरट्यांनी विविध शक्कल लढवत नागरिकांची लुट सुरु केली असून या वाढत्या घटनांमुळे नागरिक धास्तावले आहेत .त्यात कल्याण पूर्वेत लहान मुलगा घरात एकटा असल्याची संधी सांधत आधार कार्डच्या बहाण्याने घरात घुसून घरातील तब्बल ६७ हजारांचा मुद्द्मेलालंपास केला आहे .
कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात शास्त्री नगर टेकडी मिश्रा निवास येथे राहणा-या रुबी राजू या मंगळवारी दुपारी कामानिमित्त मुलाला घरत एकट सोडून बाहेर गेल्या होत्या.सदर संधी साधत अज्ञात इसम त्याच्या घरत गेला सरकारी योजनेत घर मिळवून देण्यासाठी आधार कार्ड हवे असे आमिष त्या मुलाला दाखवले व घरात प्रवेश केला. मुलगा आधार कार्ड आणण्यास आत गेला असताना घरातील कपाटा मधील ६३ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागीन्यांसह एकूण ६७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .