आदिवासी कल्याण मंत्रालय आणि ट्रायफेड 16 ते 30 नोव्हेंबर 2018 दरम्यान नवी दिल्लीत “आदि महोत्सव” आयोजित करणार- जुएल ओराम

आदिवासी कला, संस्कृती आणि खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आदिवासी कल्याण मंत्रालय आणि ट्रायफेड “आदि महोत्सव” या राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचे आयेाजन करत आहे. नवी दिल्लीत दिल्ली हाट येथे 16-30 नोव्हेंबर, नेहरु पार्क येथे 21-30 नोव्हेंबर आणि सेंट्रल पार्क येथे 16-19 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री जुएल ओराम यांनी आज बातमीदारांशी बोलताना दिली. या महोत्सवात आदिवासी कला आणि संस्कृतीच्या वस्तू, आदिवासी औषधे, आदिवासी खाद्यपदार्थ विक्रीला असतील. देशभरातील 23 राज्यांमधील आदिवासी कलाकार, खानसामे, लोकनृत्य/लोकसंगीत कलाकार सहभागी होणार असून त्यांच्या वैभवशाली पारंपारिक संस्कृतीची ओळख करुन देणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email